जिल्हा प्रशासनाच्या वतीने १ ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताह - Mahsool Saptah from 1st August by District Administration
जिल्हा प्रशासनाच्या वतीने १ ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताह
उत्कृष्ट काम करणारे अधिकारी-कर्मचारी होणार सन्मानित
लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन
वाशिम, दि. 31 (जिमाका / www.jantaparishad.com) : महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना आणि नागरिकांना व्हावी व त्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा. त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी. शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट या महसूल दिनापासून जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल सप्ताहाचे आयोजन (Mahsool Saptah from 1st August by District Administration) करण्यात आले आहे.
१ ऑगस्ट २०२३ रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. (Washim Collector Mrs. Bhuvneshwari S.) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महसूल दिनापासून सुरू होणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- १ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचा शुभारंभ,
- २ ऑगस्ट रोजी युवा संवाद, (Yuva Sanvad)
- ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, (Ek Hath Madaticha)
- ४ ऑगस्ट रोजी जनसंवाद, (Jan Sanvad)
- ५ ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, (Sainik Ho Tumchyasathi)
- ६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील महसुल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संवाद
आदी. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल विभागातील गुणवंत अधिकारी/कर्मचाऱ्यांचा तसेच त्यांच्या गुणवंत पाल्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
महसूल सप्ताह (Mahsool Saptah 2023) मध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे, लोकांची महसूल विषयक विविध कामे, सैनिकांची विविध कामे, यासाठी वेगवेगळ्या स्तरावर उपक्रम आयोजित करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. सर्व घटकातील नागरिकांना यामध्ये सामावून घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने (District Administration Washim) दिली.
Post a Comment