Header Ads

Maharashtra Agriculture Services Main Examination 2021 - Final Result Declared : महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ अंतिम निकाल जाहीर

Maharashtra Agriculture Services Main Examination 2021 - Final Result Declared : महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ अंतिम निकाल जाहीर


महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ अंतिम निकाल जाहीर

Maharashtra Agriculture Services Main Examination 2021 - Final Result Declared

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १० ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीत महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ (Maharashtra Agriculture Services Main Examination 2021 - Final Result Declared) करीता मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेमध्ये 

  • अमरावती जिल्ह्यातील देशमुख नीलेश हनुमंतराव राज्यातून आणि 
  • DESHMUKH NILESH HANUMANTRAO, Amravati : Topper in maharashtra 
  • गोंदिया जिल्ह्यातील गिऱ्हेपुंजे धर्मेंद्र यवाक्रम हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच 
  • GIRHEPUNJE DHARMENDRA YAWAKRAM, Gondiya : Topper in OBC 
  • पुणे जिल्ह्यातील गावडे भारती चंद्रकांत  या महिला वर्गवारीतून 
  • GAWADE BHARATI CHANDRAKANT, Pune : Topper in Female Category

राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तूत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण(Cut off marks) आयोगाच्या https://mpsc.gov.in/home संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त, शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने (Online) विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.