Header Ads

दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता - Disability Welfare Department : Approval to fill up 1912 posts

दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता - Disability Welfare Department : Approval to fill up 1912 posts

दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता

Disability Welfare Department : Approval to fill up 1912 posts 

मुंबई (www.jantaparishad.com) दि. ३१ : दिव्यांग कल्याण  विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ९३२ अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या  विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील १,९१२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (Disability Welfare Department : Approval to fill up 1912 posts)

शिक्षकीय १,१६७ तसेच शिक्षकेतर ५०८  ही पदे नियमित स्वरुपात आणि २३७ पदांना बाह्यस्त्रोताद्वारे अशा एकूण १९१२ पदांना भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने या उपक्रमांतील पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन या पदभरतीची कार्यवाही विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विभागाचा शासन निर्णय दि.२६ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.