Header Ads

Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister (CM) of Maharashtra - अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister (CM) of Maharashtra - अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ


अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राजभवनात शपथविधी संपन्न; राज्यपाल रमेश बैस यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ

        मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ (Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister (CM) of Maharashtra) घेतली.

        आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

        यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Legislative Assembly Speaker Adv. Rahul Narvekar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.