Header Ads

Maheshwari Samaj Karanja lad celebrated Mahesh Navami - माहेश्वरी समाज बांधवांद्वारे कारंजा लाड येथे महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी

Maheshwari Samaj Karanja lad celebrated Mahesh Navami - माहेश्वरी समाज बांधवांद्वारे कारंजा लाड येथे महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी


माहेश्वरी समाज बांधवांद्वारे कारंजा लाड येथे महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी

विविध सामाजिक उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम राबविले

          कारंजा दि ०१ -  महेश नवमी माहेश्वरी समाजाचा उत्पती दिवस. दरवर्षी प्रमाणे ज्येष्ठ शुक्ल नवमी च्या दिवशी माहेश्वरी समाज बांधवांद्वारे कारंजा लाड येथे महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी (Maheshwari Samaj Karanja lad celebrated Mahesh Navami) करण्यात आली. कारंजा शहरात कारंजा तहसील माहेश्वरी संगठन, कारंजा तहसील माहेश्वरी युवा संगठन, कारंजा तहसील माहेश्र्वरी महीला संगठन, महेश सेवा समिती,श्री. माहेश्वरी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम, परीक्षा,स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम, योगा कॅम्प, विविध सेवा कार्य करून मोठ्या थाटाने साजरा करण्यात आली.

        कारंजा शहरातील विविध सामाजिक संगठन, पर्यावरण प्रेमी संगठन गो ग्रीन फाउंडेशन यांच्या सहकार्यातून वृक्षा रोपण, वृक्ष संवर्धन चे कार्यक्रम, दिशा फाउंडेशन, कारंजा रक्तदान चळवळ, संत गाडगेबाबा रक्त पेढी, बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते ज्यात एकूण 58 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

            कारंजा तहसील महेश्वरी युवा संगठन द्वारे कारंजा माहेश्वरी प्रीमियर लीग, बुद्धिबळ,कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस अश्या विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते 

        कारंजा तहसील महेश्वरी महीला मंडळ च्या वतीने योगा कॅम्प,भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.

Maheshwari Samaj Karanja lad


        तसेच स्थानीय बालाजी मंदिर येथे भगवान महेश चे पूजा अभिषेक आरती करण्यात आले, डेंटल चेक अप कॅम्प, माहेश्वरी टॅलेंट सर्च एक्झाम, स्थानीय महेश भवन येथे भगवान श्री उमामहेश महेश्वरी उत्पती च्या चित्राचे अनावरन, प्रावीण्य प्राप्त विद्यार्थांचे सत्कार, समाजातील वरिष्ठ समाजजनचे सन्मान प्रमुख अतिथी/वक्ता श्री. अनीलजी राठी अमरावती यांचे मार्गदर्शनीय उद्बोधन झाले.

        सर्व कार्यक्रमात संपूर्ण समाजजनाचे  उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.