Header Ads

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ - Kantrati Gram Sevak Mandhan Vadh

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ - Kantrati Gram Sevak Mandhan Vadh


कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ

        मुंबई दि १३ - कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रुपये एवढी वाढ (Kantrati Gram Sevak Mandhan Vadh) करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या ग्रामसेवकास ६ हजार रुपये दर महिना मिळतात, आता ते १६ हजार एवढे मिळतील.

        राज्यात सध्या २७ हजार ९२१ ग्रामपंचायती असून १८ हजार ६७५ नियमित ग्रामसेवकांची पदे आहेत. त्यापैकी १७ हजार १०० पदे भरली असून १५७५ पदे रिक्त आहेत. वर्ष २००० पासून ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात. कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये वाढ करण्यात आली होती.  यासाठी १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये इतका आर्थिक भार पडेल.

No comments

Powered by Blogger.