Header Ads

वाशिम जिल्हयात रासायनिक खतांचा मुबलक साठा - Chemical Fertilizers in Washim District - Abundant stock available



वाशिम जिल्हयात रासायनिक खतांचा मुबलक साठा

शेतकऱ्यांनी विना पावती खत खरेदी करु नये

 कृषी विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. 03 (जिमाका / साप्ताहिक जनता परिषद, कारंजा जि.वाशिम) :  जिल्हयात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी पेरणीची पुर्व तयारी म्हणुन बियाणे व खते खरेदी करत आहेत. जिल्हयात रासायनिक खताचा (Chemical Fertilizers in Washim District) तुटवडा कुठेही नाही. जिल्हयात युरीया - १५६४ मे.टन, डीएपी - ६४३८ मे.टन,एमओपी - ३११ मे.टन,एसएसपी-१७०९८ मे.टन,संयुक्त ९ व मिश्र खते - २८३६९ मे.टन एवढया मुबलक प्रमाणात (Abundant Stock) रासायनिक खतांचा साठा आज उपलब्ध आहे.

          महिनानिहाय मंजुर आवंटनाप्रमाणे खत साठा उपलब्ध होणार आहे. जिल्हयात कुठेही खताची टंचाई नाही. शेतकऱ्यांनी अनधिकृत कंपन्याचे ग्रामीण भागात फिरत असलेले प्रतिनिधी यांच्याकडुन रासायनिक खतांची खरेदी करु नये. परवानाधारक विक्रेत्यांकडुन खरेदी करण्यात यावी.

          अनधिकृत निविष्ठा विक्रीबाबत लक्ष ठेवण्याकरीता सर्व सहा तालुकयामध्ये भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. एक जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. कोणत्याही नागरीक व शेतकऱ्यास बनावट खते विना पावतीने, जादा दराने वा संशयास्पद विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत कृषि विभागाच्या संनियंत्रण कक्षाला ९४०४३३८२१६ व ९४०४२५२६७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.