Header Ads

RBI Decision : 2000 Note out of circulation - आरबीआय ची घोषणा : २००० रुपयांच्या नोटा परत

RBI Decision : 2000 Note out of circulation - आरबीआय ची घोषणा : २००० रुपयांच्या नोटा परत


आरबीआय ची घोषणा : २००० रुपयांच्या नोटा परत 

       नवी दिल्ली दि १९ मे -  भारतीय रिजर्व बँक (RBI) ने आज शुक्रवार दिनांक १९ मे २०२३ रोजी २,००० (दोन हजार) रुपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याची घोषणा (RBI Decision : 2000 Note out of circulation) केली. मात्र ह्या नोटा लीगल टेंडर (वैध चलन) रूपात राहणार आहेत. २३ मे पासून २००० रुपयांच्या १० नोटा बँकेत जाऊन बदली केल्या जाऊ शकतील आणि  ह्याची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत आहे. ज्यांचे कडे २००० रुपयांची चलन आहे त्यांना हवी तितकी रक्कम बँकेत आपल्या खात्यात भरता येऊ शकेल मात्र यासाठी बँक खाते केवायसी (KYC) असणे आवश्यक आहे.  

        गत वेळेस दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी ची तात्काळ रूपात घोषणा केली  होती. मात्र आज रोजी आरबीआय ने केलेली हि घोषणा नोटबंदी नसून नोट बदली आहे. 

No comments

Powered by Blogger.