Header Ads

PM Kusum Yojana for Saur Krishi Pump : शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेचा लाभ घ्यावा

PM Kusum Yojana for Saur Krishi Pump : शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेचा लाभ घ्यावा


शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेचा लाभ घ्यावा

PM Kusum Yojana for Saur Krishi Pump

       वाशिम, दि. 27 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी ‘महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक योजने (PM Kusum Yojana) च्या पुढील टप्प्यांतर्गत सौर कृषी पंपा (Saur Krishi Pump) करिता महाऊर्जेच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज (Application Online Portal Mahaurja) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

         शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनसुार ३,५ व ७.५ एच.पी.(डी.सी) क्षमतेचे पारेषण विरहीत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येतात.

         या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थी हिस्सा पुढीलप्रमाणे असणार आहे. खुला (१० टक्के) ३ एचपी १९३८०रू,५ एचपी २६,९७५ रू, ७.५ एचपी ३७,४४० रू, अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी  ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल. यात ३ एचपी ९,६९०,रू,  ५ एचपी १३,४८८ रू व ७.५ एचपी १८, ७२० रू आहे. 

       अर्ज ऑनलाईन सादर करताना त्यासोबत विहीर,कुपनलिका याची नोंद असलेला सातबारा,जमीन मालक एकापेक्षा जास्त असल्यास २०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नाहरकत पत्र,आधरकार्ड,छायाचित्र, पासबूकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी.

          शेतक-यांना  महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B  या संकेतथळावर भेट देऊन या योजनेअंतर्गत अर्ज सादर करता येतो.

        महाऊर्जामार्फत जिल्हानिहाय उपलब्ध करून दिलेल्या कोट्यानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येईल.योजनेबाबतची सर्व माहिती व पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची सर्व माहिती महाऊर्जाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट व फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये, तसेच जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना महाकृर्षी ऊर्जाअभियान पीएम कुसुम  घटक-ब योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन महासंचालक तसेच महाऊर्जा,प्रकल्प कार्यकारी अधिकारी  यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.