Header Ads

MPSC : Excise Sub Inspector exam 2022 Final Result Announced : दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

MPSC : Excise Sub Inspector Final Result 2022 Announced : दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर


दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

MPSC : Excise Sub Inspector Final Result 2022 Announced 

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२२

        मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे व दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबई जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे (MPSC : Excise Sub Inspector Final Result 2022 Announced). त्यानुसार एकूण ०९ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

        परिक्षेमध्ये सोलापूर  जिल्ह्यातील मानेदेशमुख अनिकेत सिद्धेश्वर (Manedeshmukh Aniket Siddheshwar from Solapur District) हे राज्यातून प्रथम (First in State) आले आहेत. सांगली जिल्ह्यातील साळुंखे अभिजीत अशोक हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. (Salunkhe Abhijit Ashok from Sangli district first in OBC) महिला वर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीमती कुपटे अक्षता महादेव ह्या प्रथम  (Smt. Kupte Akshata Mahadev of Kolhapur district first in the women category) आल्या आहेत.

        उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

        अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज  करावेत, असे आयोगाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.