Header Ads

Motor Vehicle Aggregator Regulations - मोटार वाहन समुच्चक नियमावली : नागरीकांची मते व अभिप्राय मागविले

Motor Vehicle Aggregator Regulations - मोटार वाहन समुच्चक नियमावली : नागरीकांची मते व अभिप्राय मागविले


मोटार वाहन समुच्चक नियमावली

नागरीकांची मते व अभिप्राय मागविले

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : केंद्र शासनाने ओला (Ola), उबेर (Uber) व इतर ॲग्रीगेटर्स कंपन्यां साठी जारी केलेल्या ॲप आधरीत मार्गदर्शक सूचना ( Regulations for app-based vehicle operation) विचारात घेऊन ॲप आधारीत वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची बाब राज्य शासनाच्या कार्यवाहीखाली आहे. केंद्र शासनाच्या मार्गर्दाक सूचना www.morth.nic.in या संकेतस्ळावर नागरीकांसाठी उपलब्ध आहे. सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चक नियमावलीचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने समिती गठीत करण्यात आली आहे.

          तरी याविषयी ज्यांना आपले अभिप्राय/मत सादर करावयाचे असतील, त्यांनी आपले मत/अभिप्राय dycommr.enf1@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे प्रत्यक्षरित्या 20 मे पर्यंत सादर करावे. प्राप्त मते व अभिप्राय विचारात घेवून सूचना अंतिम करण्याविषयी शासनाकडून पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.


No comments

Powered by Blogger.