Header Ads

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ११ वी प्रवेश अर्ज आमंत्रित jawahar navoday vidyalay application for admission in 11th standard

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ११ वी प्रवेश अर्ज आमंत्रित jawahar navoday vidyalay application for admission in 11th standard


जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ११ वी प्रवेश अर्ज आमंत्रित

       वाशिम, दि. 12 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय पार्श्व प्रवेश चाचणी इयत्ता 11 वी करीता सन 2023-24 चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हयातील मान्यताप्राप्त शाळा सीबीएसई किंवा इतर कोणत्याही राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न/अन्य शासन मान्यता प्राप्त मंडळ येथे जवाहर नवोदय विद्यालय शैक्षणिक सत्र 2022-23 दरम्यान स्थित आहे. सत्र 2022-23 पूर्वी इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र नाहीत. फक्त भारतातील रहिवासी जे इयत्ता 10 वी भारतातून शिकला आहे तो परिक्षेस पात्र आहे. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी पूर्णत: मोफत राहील. फॉर्म भरण्यासाठी www.navodaya.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. फॉर्ममधील चुका दुरुस्तीसाठी correction window 1 व 2 जुन 2023 रोजी सुरु राहील. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.