Header Ads

चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन - charmkar vikas mahamandal yojana application

चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन - charmkar vikas mahamandal yojana application


चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

केंद्र सरकारच्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

            मुंबई दि. 4 : चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

        सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (sant rohidas charmodyog charmakar vikas mahamandal) मार्फत चर्मकार समाजाची (चांभार, मोची, ढोर, होलार) आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य शासन अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येतात, तर केंद्र सरकारतर्फे एन.एस.एफ.डी.सी. योजना (NSFDC Yojana) राबविण्यात येते.

        अनुदान योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत परिपूर्ण कागदपत्र असलेले कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समितीमार्फत निवड झाली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधित पात्र अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह मुंबई शहर जिल्हा कार्यालय, खेरवाडी, वांद्रे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती पुराणिक यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.