Header Ads

येत्या काळात उष्माघात चे प्रमाण वाढते राहील त्यामुळे सावध राहा - श्याम सवाई - Appeal by Shyam Sawai Karanja lad, Sarva Dharma Mitra Mandal

 

येत्या काळात उष्माघात चे प्रमाण वाढते राहील त्यामुळे सावध राहा - श्याम सवाई - Appeal by Shyam Sawai Karanja lad, Sarva Dharma Mitra Mandal


येत्या काळात उष्माघात चे प्रमाण वाढते राहील त्यामुळे सावध राहा - श्याम सवाई 

वाशिम जिल्हा तापमान अंदाजे ४९ च्या जवळ जाईल तर प्रत्येकाने आपल्या नैसगिक उपाय योजना वर भर द्यावा 

        कारंजा लाड (www.jantaparishad.com) दि १२ - येत्या काळात वातावरणातील मोठ्या प्रमाणात होणारे बदल पाहता, ज्या प्रमाणात गारपिट पाऊस आहे त्याहि पेक्षा उन्हा ची स्थिती वेगळी राहील असे सास उष्माघात पिडीत साहय उपाय योजना समिती चे अध्यक्ष श्याम सवाई (Shyam Sawai) यांनी दि ११/५/२३ रोजी सकाळी ११ वाजता सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा लाड (Sarva Dharma Mitra Mandal Karanja) च्या कार्यालय मध्ये आयोजित बैठक मध्ये व्यक्त केले.

        ग्रामीण नागरीकानी खास करूण शेतकरी व शेतमजूर नी खास काळजी घेऊन आपले कामाचे वेळ सकाळी चे ठेवावे. चहा चे प्रमाण कमी करूण सोबत निबू साखर मिठ ठेवावे. शक्य झाल्यास ग्लुकोज व इलेक्ट्राल ऑरेज चे छोटे पॉकीट प्रत्येकाने खिश्यात ठेवावे. स्वःता करीता किंवा दळण-वळण करताना कोणाला चक्कर आली तर तत्काळ मदत करता येईल असे मत व्यक्त केले. गरज पडल्यास जवळच्या रुग्णालयामध्ये तात्काळ जावे.        

     वाढत्या उन्हाचे प्रमाण लक्षात घेता उन्हामध्ये थांबण्यासाठी उष्माघात बचाव केंद्र शासन स्तरावर उघडी करावी त्यात बसण्याची व्यवस्था आराम करण्याची व्यवस्था असावी जेणे करुण  बेघरांना फार मदत होईल तसेच वाशिम जिल्ह्यात उन्ह च्या वाढत्या तापमान मूळे रुग्णाची संख्या वाढणार नाही तसेच जिवित हानी होणार नाही या करीता जिल्ह्यामधील सेवा भावी संस्था नी आपल्या आपल्या परीने मदत जन जागुती करावी हि विनंती श्याम सवाई अध्यक्ष सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा यांनी केली.

No comments

Powered by Blogger.