Header Ads

वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करा - Take preventive measures in view of increasing corona infection



कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच चाचणी करा

वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करा

      वाशिम, दि. 14 (जिमाका) : जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. त्यामुळे जिल्हयातील कोरोना रुग्ण संख्येमध्ये देखील वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्हयात कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरीकांनी नियमित मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. 

        घराबाहेर निघतांना मास्कच्या वापरासह कोविड-19 बाबत योग्य वर्तणुक तसेच गर्दीच्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी विशेषत: आजारी व्यक्ती किंवा सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वयोवृध्द व्यक्ती यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. घरात किंवा घराबाहेर निघाल्यानंतर शिंकतांना किंवा खोकतांना नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्क किंवा हात रुमाल किंवा टिश्यु पेपरचा वापर करावा. कोविड-19 ची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून कोविड-19 ची चाचणी करणे गरजेचे आहे. 

        जिल्हयातील नागरीकांनी कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्या सोबतच योग्य वर्तणुकीचे पालन करावे. नागरीकांनी घराबाहेर निघतांना मास्कचा नियमित वापर करावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

No comments

Powered by Blogger.