Header Ads

स्वातंत्र्यविर सावरकर गौरव यात्रेस कारंजा शहरात उत्फुर्त प्रतिसाद swatantraveer sawarkar gaurav yatra in Karanja lad

स्वातंत्र्यविर सावरकर गौरव यात्रेस कारंजा शहरात उत्फुर्त प्रतिसाद swatantraveer sawarkar gaurav yatra in Karanja lad


स्वातंत्र्यविर सावरकर गौरव यात्रेस कारंजा शहरात उत्फुर्त प्रतिसाद

कारंजा दि. ०५ :- दिनांक ४ एप्रिल रोजी कारंजा शहरात स्वातंत्र्यविर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. कारंजा शहरतील या गौरव यात्रेस नागरिकांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.भाजपा पदाधिकारी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे,शहर अध्यक्ष ललित चांडक , भाजपा जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील काळे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजय काळे, महीला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ. शारदा ताई बांडे, शहर अध्यक्षा सौ पायल तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी , महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह गौरव यात्रा पोहा वेस, शिवाजी नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, जय स्तंभ चौक, शहीद भगतसिंग पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून टिळक चौक आणि पोहा वेस येथील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्या जवळ पोहचली येथेच समारोप करण्यात आला. 



गौरव यात्रे दरम्यान मार्गातील सर्व पुतळ्यांना मान्यवरांनी हारार्पण केले. भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते व हातात भगवे ध्वज घेवुन कार्यकर्ते वंदे मातरम् घोषणा देत होते. 



गौरव यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात भाजपा जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांनी आपल्या अमोघ वाणीतून स्वातंत्र्य विर सावरकर यांच्या जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकत काँगेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर राष्ट्रगीत झाले. 

कार्यक्रम संचलन संजय भेंडे, मनोज शिवाल यांनी केले.  कार्यक्रमाची येथेच सांगता करण्यात आली. 



शहर व ग्रामीण भागाचे भाजपा कार्यकर्ते , भाजपा महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्या ,युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिवाय गावातील गणमान्य व्यक्ती हजर होते. गौरव यात्रा करीता नियोजन भाजपा सरचिटणीस शशी वेळूकर, अमोल गढवाले, पं स सदस्य दिनेश वाडेकर, पं स शुभम बोनके यांनी केले.असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले.

No comments

Powered by Blogger.