Header Ads

ज्येष्ठ उद्योगपती केशुब महिंद्रा यांचं निधन - Keshub Mahindra Passes Away

ज्येष्ठ उद्योगपती केशुब महिंद्रा यांचं निधन - Keshub Mahindra Passes Away


ज्येष्ठ उद्योगपती केशुब महिंद्रा यांचं निधन

Keshub Mahindra Passes Away

    ज्येष्ठ उद्योगपती आणि आनंद महिंद्रांचे (Anand Mahindra) काका केशुब महिंद्रा (Keshub Mahindra Passes Away) यांचं निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते.  

    1963 ते 2012 या काळात ते महिंद्रा अँड आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष (Formar M & M President) होते. 2012 मध्ये त्यांनी सगळी सूत्र आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवली. केवळ विलीज जीप या कारची जोडणी करणारी कंपनी ही महिंद्राची ओळख त्यांनी पुसून काढली. प्रवासी वाहनं, मालवाहू वाहनं तसंच ट्रॅक्टरमध्ये महिंद्रा कंपनीला अग्रस्थानी पोहोचवण्यात केशुब यांचा सिंहाचा वाटा होता. 

        महिंद्रा कंपनीला अग्रस्थानी पोहोचवण्यात केशुब यांचा सिंहाचा वाटा होता.  फक्त देशातच नाही तर जगभरात त्यांनी कंपनीचा विस्तार केला. महिंद्रा अॅन्ड महिंद्रा आपल्या ट्रॅक्टरबरोर, एसयूव्ही बरोबर हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि सॉफ्टवेअर सर्व्हिससाठी देखील ओळखले जाते. 

    अनेक कंपन्यांच्या बोर्डावर ते संचालकही राहिले. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, ताज हॉटेल अशा अनेक कंपन्यांमध्ये  त्यांनी संचालक म्हणून सेवा दिली. 

        फोर्ब्सने जारी केलेला 2023 च्या अरबपतींच्या यादीत केशुब महिंद्रा यांचा समावेश होता. फोर्ब्सच्या बिलिनिअर्स लिस्टनुसार केशुब महिंद्रा  1.2 बिलियन डॉलर (Keshub Mahindra Net Worth) संपत्ती सोडून गेले आहे. केशुब महिंद्रा यांनी पेन्सिलवेनिया विद्यापीठातून पदवी मिळावल्यानंतर 1947 सालापासून महिंद्रा ग्रुपमध्ये  काम करण्यास सुरुवात केली. 1963 साली महिंद्रा ग्रुपचे ते चेअरमन झाले. 

        उद्योग क्षेत्रात दिलेल्या  योगदानाबद्दल 1987 साली त्यांना फ्रान्स सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील गौरवण्यात आले. याशिवा. केशुब महिंद्रा यांना 2007 साली Ernst and Young तर्फे लाईफटाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. 

No comments

Powered by Blogger.