Header Ads

वाशिम जिल्हयातील ५५ ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी १८ मे रोजी मतदान gram panchayat election Washim district

वाशिम जिल्हयातील ५५ ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी १८ मे रोजी मतदान gram panchayat election Washim district


वाशिम जिल्हयातील ५५ ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी १८ मे रोजी मतदान

         वाशिम, दि. 10 (जिमाका) :  राज्य निवडणूक आयोगाने 31 डिसेंबर 2022 पर्यंत विविध कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/ थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकी साठी ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्हयातील 55 ग्रामपंचायतीच्या एकूण 92 रिक्त सदस्यांसाठी आणि 5 रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी येत्या 18 मे रोजी निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये 

  1. वाशिम तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा समावेश असून 29 ग्रामपंचायत सदस्यांची रिक्त पदे, 
  2. मालेगांव तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीच्या 10 ग्रामपंचायत सदस्यांची रिक्त पदे व 1 रिक्त सरपंच पद, 
  3. रिसोड तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यांसाठी, 
  4. मंगरुळपीर तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या 11 सदस्यांसाठी आणि 1 सरपंच पदासाठी, 
  5. कारंजा तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या 15 रिक्त सदस्यांसाठी आणि 1 सरपंच पदासाठी आणि 
  6. मानोरा तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या 21 सदस्यांसाठी आणि 2 सरपंच पदासाठी 

हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

             राज्य निवडणूक आयोगाकडून या पोट निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहिर केला आहे. 18 एप्रिल रोजी तहसिलदार हे निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करतील. 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशपत्रे मागविणे व सादर करणे. 3 मे रोजी सकाळी 11 वाजता पासून नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. 8 मे रोजी दुपारी 3 वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल व दुपारी 3 वाजतानंतर निवडणूक चिन्ह वाटप करुन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. 18 मे रोजी सकाळी 7.30 वाजतापासून ते सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत मतदान घेण्यात येईल. 19 मे रोजी मतमोजणी करुन निकाल घोषित करण्यात येईल. 24 मे 2023 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.      

No comments

Powered by Blogger.