Header Ads

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली 'शहर सौंदर्य स्पर्धा' : ‘City Beauty Competition’ info in marathi

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली 'शहर सौंदर्य स्पर्धा' : ‘City Beauty Competition’ information in marathi


गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली 'शहर सौंदर्य स्पर्धा'

‘City Beauty Competition’ information in marathi 

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2023 -

        गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 26 एप्रिल 2023 रोजी ‘सिटी ब्युटी कॉम्पिटिशन’ (‘City Beauty Competition’ information in marathi ) अर्थात "शहर सौंदर्य स्पर्धा" पोर्टल (Portal) https://citybeautycompetition.in सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ऑनलाइन प्रक्रियेद्वारे या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. देशभरातील शहरे आणि प्रभागांनी सुंदर, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक सार्वजनिक ठिकाणे निर्माण करण्यासाठी केलेल्या परिवर्तनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना पारितोषिक देऊन गौरवणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

        या स्पर्धेअंतर्गत, शहरांमधील प्रभाग आणि सार्वजनिक ठिकाणांची निवड ही खालील पाच मुद्द्यांच्या आधारे केली जाईल ज्यामध्ये (i) सुगम्यता  (ii) सुविधा (iii) विविध उपक्रम (iv) सौंदर्यशास्त्र आणि (v) पर्यावरण स्थिती यांचा समावेश असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील सर्वात सुंदर प्रभाग आणि सार्वजनिक जागांना पुरस्कृत केले जाईल.  तसेच निवडलेल्या प्रभागांचा शहर आणि राज्य स्तरावर सत्कार केला जाईल. वॉटरफ्रंट्स , ग्रीन स्पेसेस (हरित जागा) पर्यटन/वारसा ठिकाणे आणि बाजार/व्यावसायिक ठिकाणे या चार श्रेणींमधून निवड झालेल्या शहरांमधील सर्वात सुंदर सार्वजनिक  ठिकाणांना प्रथम राज्य स्तरावर पुरस्कृत केले जाईल आणि त्यानंतर निवडलेल्या प्रवेशिकांचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांसाठी विचार केला जाईल.

        या शहर सौंदर्य स्पर्धेत'' सहभागी होण्याची अंतिम तारीख (Last Date) 15 जुलै 2023 आहे. सहभागी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याकडील आवश्यक माहिती, डेटा/दस्तऐवज (छायाचित्रे, व्हिडिओ, सादरीकरण आणि स्वतःकडील माहितीसह) https://citybeautycompetition.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधेद्वारे सादर करावी. या स्पर्धेकरता ज्ञान भागीदार म्हणून अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया (ASCI - Administrative Staff College of India) प्रभाग/ स्थानिक स्वराज्य संस्था/ आणि राज्यांना आवश्यक ती सर्व मदत करेल.

No comments

Powered by Blogger.