Header Ads

वाशिम जिल्हयात 30 एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - prohibition order till 30 April in washim district

वाशिम जिल्हयात 30 एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - prohibition order till 30 April in washim district


वाशिम जिल्हयात 30 एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

        वाशिम, दि. 14 (जिमाका) : मुस्लीम बांधवांचा रमजान महिना 24 मार्चपासून सुरु झाला आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने 14 ते 30 एप्रिलपर्यंत जिल्हयात मिरवणूका काढण्यात येणार आहे. रमजान महिन्यात मुस्लीम धर्मियांकडून 18 एप्रिल रोजी शब्बे-ए-कद्र, 21 एप्रिल रोजी जुम्मात विदा म्हणजे रमजानचा शेवटचा शुक्रवार व 22 एप्रिल रोजी चंद्र दर्शनानसार रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. 

    कारंजा शहर, अनसिंग व शिरपूर (जैन) येथे वेगवेगळया कारणावरुन जातीय तणाव निर्माण झाला होता. वरील परिस्थतीचा विचार करता आगामी काळातील सण उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाज माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश किंवा व्हिडीओ प्रसारीत करण्यास मनाई आहे. 

        जिल्हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. परंतू सद्यस्थितीत जातीय सलोखा कायम असून जिल्हयात शांतता आहे. जिल्हयात शांतता अबाधित रहावी यासाठी 13 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुध्द कारवाई करण्यात येईल.     

No comments

Powered by Blogger.