Header Ads

जिल्हा युवा पुरस्कार : 24 एप्रिलपर्यंत अर्ज मागविले Jila yuva puraskar application invited

जिल्हा युवा पुरस्कार : 24 एप्रिलपर्यंत अर्ज मागविले Jila yuva puraskar application invited


जिल्हा युवा पुरस्कार : 24 एप्रिलपर्यंत अर्ज मागविले

        वाशिम, दि. 17 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम अंतर्गत जिल्हयातील युवक/युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी युवा धोरण २०१२ नुसार जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार (Jila Yuva Puraskar) प्रतिवर्षी देण्याची योजना आहे. त्यानुसार सन २०२१-२२ या अर्थिक वर्षातील जिल्हास्तरीय युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव मागविण्यात येत आहे. युवक व युवतींनी जिल्हयामध्ये १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत केलेली कामगिरी विचारात घेण्यात येणार आहे.

          युवक, युवती व सामाजिक संस्था यांनी केलेले कार्य जसे ग्रामिण व शहरी भागातील सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन, राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभुत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक अनुसुचित जाती, जमाती इत्यादी बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान व तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्री भृणहत्या, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागींण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक संस्था, साहसी उपक्रम इत्यादी बाबतचे जिल्हयात मागील तीन वर्षात केलेले कार्य विचारात घेतले जाणार अहे.

            संस्थेनी केलेली कार्य व पात्रता निकष पूढील प्रमाणे आहे. अर्जदार संस्था ही सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० व ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजिबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान ५ वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंपूर्तीने केलेले असावे. अर्जदार संस्थेने वर दर्शविल्याप्रमाणे केलेले कार्यांचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्ती पत्रे, चित्रफिती व फोटो इत्यादी पुराव्यासह जोडणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या युवक, युवती व संस्था या पुरस्कारार्थींना पुरस्काराचे वितरण १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे. यात वैयक्तीक, युवक व युवती पुरस्कार्थींना प्रत्येकी 10 हजार रुपये रोख, गौरवपत्र व सन्मानचिन्ह तसेच संस्थेस ५० हजार रुपये रोख, गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

           तरी जिल्हयातील युवक, युवती व सामाजिक संस्था यांनी ते करीत असलेल्या उपक्रमात घेतलेला सहभाग व केलेले कार्य याबाबतच्या पुराव्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे अर्ज करावा. युवा पुरस्काराकरीता १८ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. २४ एप्रिल २०२३ पर्यंत परिपूर्ण पुरस्कारार्थ्यांचे अर्ज संपुर्ण कागदपत्रांसह पाकिटबंद लिफाफयात सादर करावे. इच्छुक अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर (७५१७५३६२२७) यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.