Header Ads

वाशिम (वत्सगुल्म) येथे सामुहिक व्रतबंध सोहळा - samuhik vratbandh sohala in Washim

वाशिम (वत्सगुल्म) येथे सामुहिक व्रतबंध सोहळा - samuhik vratbandh sohala in Washim


वाशिम (वत्सगुल्म) येथे सामुहिक व्रतबंध सोहळा

इच्छुक मातापित्यांनी आपल्या पाल्याची नोंद करण्याचे आवाहन

        वाशिम दि २४ - ब्रम्हलीन प.पुज्य भादोलकर महाराज यांच्या प्रेरणेने तथा आशिर्वादाने ब्राम्हण सभा वाशिम अंतर्गत सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राम्हण मंडळ वाशिम तर्फे बुधवार, १० मे रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक श्री मध्यमेश्वर संस्थानमध्ये एकदिवशीय सामुहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            ज्या समाज बांधवांना आपल्या पाल्याची मौंज ह्या सामुहिक व्रतबंध सोहळ्यात करण्याची इच्छा असेल त्यांनी रमेश लक्रस देवपेठ, विकास देशपांडे सिव्हील लाईन, माधवराव शेवलकर देवपेठ, श्रीकांत दातार सावरकर पेठ, राजेश संगवई दुर्गा चौक, देविदास देव सत्संग भवन जवळ, सुहास पांडे रविवार बाजार व पंकज लक्रस देवपेठ यांच्याशी संपर्क साधुन येत्या ५ मे पर्यत आपल्या बटुची नोंद करावी. नोंद झालेल्यांनी बटु व कुटुंबियांसह सकाळी ७ वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. मौजी पुर्वीचे व नंतनचे आपल्याकडील कुळाचार आपल्या घरी करुन घ्यावे. मुक्कामाची सोय नसल्यामुळे बाहोरगावच्या मंडळींना आपल्या राहण्याची व्यवस्था स्वत: करावी लागेल. 

        तरी इच्छुक मातापित्यांनी सामुहिक व्रतबंध सोहळ्याकरीता तारखेच्या आत नोंद करण्याचे आवाहन सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राम्हण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.