Header Ads

तालुक्यातून २ प्रमाणे वाशीम जिल्ह्यातून १२ युवक- युवतींची होणार निवड - nehru yuva kendra washim district news

 


भारत सरकारच्या विविध योजनेसाठी  ९ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

तालुक्यातून २ प्रमाणे वाशीम जिल्ह्यातून १२ युवक- युवतींची होणार निवड 

मासीक मानधन व प्रवास भत्ता दरमहा 5 हजार रुपये

       वाशिम, दि. 26 www.jantaparishad.com (जिमाका) : जिल्हयात युवकांचे नेटवर्क तयार करणे, भारत सरकारच्या विविध योजनेत सहभाग घेणे व युवकांचे सक्षम नेतृत्व स्विकारुन राष्ट्र निर्माण कार्यात योगदान देण्यासाठी भारत सरकार व्दारा युवकांनी त्यांची उर्जा व क्षमता यांची स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण कार्यात योग्य वापर करणे, तसेच साक्षरता, आरोग्य, स्वच्छता, लिंगभेद, सामाजिक समस्येविषयी जागरुकता अभियान राबविणे, विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख भुमिका निभावणे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास मदत करणे अशा विविध कार्यक्रमात त्यांना योग्य दिशा देण्याकरीता जिल्हयातील विशेषतः ग्रामीण युवक- युवतींकडून जिल्हयातील 6 तालुक्यासाठी प्रत्येक तालुक्याकरीता 2 उमेदवार निवडीसाठी एकूण 12 युवक- युवतींची निवड करण्यासाठी आणि कार्यालयाकरीता 2 युवक-युवती संगणकाचे काम करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

         यासाठी शैक्षणिक पात्रता किमान इ. 10 वी उत्तीर्ण (उच्च शिक्षण, पदवी, पदव्युत्तर व बेसिक कॉम्प्युटर ज्ञान असलेल्यांना प्राधान्य), 18 ते 29 या वयोगटातील (दिनांक 01 एप्रिल 2023 ला 18 वर्ष पुर्ण व 29 वर्षापेक्षा कमी), सोशल मिडीआबाबत ज्ञान असलेल्यांना प्रथम प्राधान्य, उमेदवारांकडे स्मार्ट मोबाईल फोन व त्याचे विविध अॅपसंबंधी बेसिक माहिती, ई-बँकींग डिजीधन, नेहरू युवा केंद्र संगठनसोबत संलग्नीत युवा मंडळाच्या युवकांना प्राधान्य. शिक्षण सुरु असणाऱ्या युवक-युवती या पदाकरीता पात्र ठरणार नाही. मासीक मानधन व प्रवास भत्ता दरमहा 5 हजार रुपये,

        ही शासकीय नोकरी नाही. एक किंवा दोन वर्ष कार्य केल्यानंतर या कार्याच्या आधारे नोकरीकरीता कायदेशीर हक्क दाखविता येणार नाही.

          अर्ज करण्यासाठी नेहरु युवा केंद्र संगठन या वेबसाईट www.nyks.nic.in वर या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या साईटवर अर्ज 9 मार्च 2023 पर्यंत करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण येत असल्यास आवश्यक कागदपत्रांसह 9 मार्च 2023 पर्यंत अर्ज नेहरू युवा केंद्र कार्यालय, भागीरथ निवास, सिव्हील लाईन, वाशिम (nehru yuva kendra washim district) या पत्यावर हजर राहून विचारणा करता येईल. अर्जदार ज्या तालुक्याकरीता अर्ज करीत असेल, त्या तालुक्यातील रहिवासी असावा आणि त्याच तालुक्यात अर्जदारास काम करावा लागेल.

No comments

Powered by Blogger.