Header Ads

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक - वाशिम जिल्ह्यात ५४.८० टक्के मतदान voting in washim district in graduate constituency election



अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 

वाशिम जिल्ह्यात ५४.८० टक्के मतदान

९ हजार ८९१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 

वाशिम दि.30 www.jantaparishad.com (जिमाका) - अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 30 जानेवारी रोजी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 26 मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान झाले.जिल्ह्यातील एकूण 18 हजार 50 मतदारांपैकी 9 हजार 891 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी 54.80 टक्के इतकी आहे.सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाले. या निवडणुकीतील 23 उमेदवारांचे भाग्य आज मतपेटीत बंद झाले. 

         वाशिम तालुक्यातील 2 हजार 346 पुरुष आणि 733 स्त्री असे एकूण 3 हजार 79 मतदार, मालेगाव तालुक्यातील 875 पुरुष आणि 149 स्त्री असे एकूण 1 हजार 24 मतदार, रिसोड तालुक्यातील 1 हजार 418 पुरुष आणि 285 स्त्री आणि एक इतर अशा एकूण 1 हजार 704 मतदार,मंगरूळपीर तालुक्यातील 1 हजार 39 पुरुष आणि 276 स्त्री अशा एकूण 1 हजार 315 मतदार, कारंजा तालुक्यातील 1 हजार 548 आणि 627 स्त्री अशा एकूण 2 हजार 175 आणि मानोरा तालुक्यातील 474 पुरुष आणि 120 स्त्री अशा एकूण 594 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

            तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.वाशिम तालुका - 51.71 टक्के,मालेगाव तालुका - 59.05 टक्के,रिसोड तालुका - 58.94 टक्के, मंगरूळपीर तालुका - 57.15 टक्के,कारंजा तालुका - 54.10 टक्के आणि मानोरा तालुका - 51.65 अशी आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.