Header Ads

प्रा. निर्मलसिंह ठाकूर स्वामी विवेकानंद युवाप्रेरणा पुरस्काराने सन्मानित - Prof. Nirmal Singh Thakur awarded by Swami Vivekanand Yuva Prerana award 2023

 

प्रा. निर्मलसिंह ठाकूर स्वामी विवेकानंद युवाप्रेरणा पुरस्काराने सन्मानित - Prof. Nirmal Singh Thakur awarded by Swami Vivekanand Yuva Prerana award 2023

प्रा. निर्मलसिंह ठाकूर स्वामी विवेकानंद युवाप्रेरणा पुरस्काराने सन्मानित

Prof. Nirmal Singh Thakur awarded by Swami Vivekanand Yuva Prerana award

        कारंजा दि १६ : स्थानिक आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेचे संचालक, करीयर मार्गदर्शक तथा  नरसी मोनजी विद्यापीठ, मुंबई येथे कार्यरत प्रा.निर्मलसिंह ठाकूर (Prof. Nirmal Singh Thakur) यांना  ग्रामीण शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी करीत असलेल्या सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाप्रेरणा पुरस्कार-२०२३ (Swami Vivekanand Yuva Prerana award 2023) ने  सन्मानित करण्यात आले. युवकमित्र परीवार, महाराष्ट्र राज्य या संस्थेद्वारे  पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे दिनांक १५ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान युवक, युवती, पत्रकार आणि शिक्षकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र  आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. महात्मा फुले विद्यानिकेतनच्या अध्यक्षा स्मिताताई वाघ, ज्येष्ठ उद्योजक गोविंद डाके, करंट केयर फाऊंडेशनचे किशोर कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते रतन माळी, ज्येष्ठ कवी नानाभाऊ माळी, जीसटी ईन्सपेक्टर डाॅ. प्रमिला तेलवाडकर, युवकमित्र परीवारचे अध्यक्ष प्रविण महाजन या मान्यवरांच्या हस्ते  प्रा. ठाकूर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

        आदिशक्ती संस्थेच्या (Adishakti Sanstha) वतीने वाशिम आणि अकोला जिल्ह्य़ातील ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांसाठी गेल्या आठ वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तकपेढी योजना, विद्याश्री शिष्यवृत्ती योजना, करीयर मार्गदर्शन शिबीर,  आदिशक्ती पुरस्कार, स्वयम कौशल्य विकास योजना इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून ३००० पेक्षा जास्त  ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांना आतापर्यंत मदत करण्यात आली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर ऊभे रहावे याकरीता  संस्थेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आदिशक्ती संस्थेला सढळहस्ते मदत करनारे दानदाते, संस्थेच्या अध्यक्षा कविता ठाकूर, सर्व सदस्य, संस्थेचे सर्व कार्यक्रम समन्वयक, संस्थेच्या योजना प्रभावीपणे राबविणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यानेच हे  सामाजिक कार्य सुरू आहे आणि ज्यांना आदर्श मानून सामाजिक कार्य सुरू केले अशा स्वामी विवेकानंदांच्या नावाने मिळालेला  पुरस्कार आम्हाला अजून जोमाने कार्य करण्यास प्रेरित करेल असे या प्रसंगी प्रा. ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.