Header Ads

प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वज विक्री व वापरास मनाई - Plastic made Indian National Flag Banned

प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वज विक्री व वापरास मनाई - Plastic made Indian National Flag Banned


प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वज विक्री व वापरास मनाई

       वाशिम, दि. 19 (जिमाका) : 26 जानेवारी या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनी लहान आकारातील कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजांची विक्री मोठया प्रमाणात केली जाते. शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्यासह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी राष्ट्रध्वज विकत घेतात व त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकून देतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. काहीवेळा तसेच विशेष कला व क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज फेकले जातात. रस्त्यात विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लास्टिकचे असतील तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नाही. त्यामुळे बरेच दिवस त्याच ठिकाणी पडून असतात. राष्ट्रहिताचे दृष्टीने ही गंभीर बाब आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, त्याअनुषंगाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री व वापर कोणही करु नये.

         राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना करणे दंडनीय अपराध आहे. वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण झालेले किंवा माती लागलेले, रस्त्यावर किंवा मैदानात पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था व सर्व यंत्रणेमार्फत ही बाब विद्यार्थी व नागरीकांच्या निदर्शनास आणून देण्याकरीता सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.