Header Ads

शिखरजी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्याठी कारंजात जैन बांधवांचा मोर्चा - morcha by sakal jain samaj in karanja lad

 


शिखरजी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्याठी कारंजात जैन बांधवांचा मोर्चा

उप विभागीय महसुल अधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन

    कारंजा लाड (www.jantaparishad.com) दि. 11 - श्री सम्मेद शिखरजी या जैन समुदायाच्या तीर्थक्षेत्राला झारखंड सरकारने दिलेल्या पर्यटन स्थळाच्या दर्जाला सकल जैन समाज बांधवाचा विरोध तसेच शिखरजी तीर्थक्षेत्राला पवित्र तिर्थक्षेत्र म्हणुन घोषीत करावे या मागणीसाठी कारंजातील सकल जैन बांधवाकडून मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या वतीने उपविभागीय महसुल अधिकारी कारंजा यांना जैन समाज बांधवांच्या वतीने दि. 11 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले.

        जैन समाजाच्या मूकमोर्चाला स्थानिक गांधी चैकातील जैन मंदीर तथा अहिंसा भवन येथून प्रारंभ झाला. या प्रंसगी सर्वप्रथम 108 वेळा नमोकार मंत्राचा जाप करण्यात आला. यानंतर श्वेताबंरी स्वाध्ववी संयम गुणाजी महाराज, स्वाध्ववी चैत्य गजानी महाराज, स्वाध्ववी मल्ली गुणाजी महाराज यांनी जैन समाज बांधवाना मार्गदर्शन केले. नंतर आमदार राजेंद्र पाटणी, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांनी मार्गदर्शन केले. यानंतर जैन समाजाच्या मूकमोर्चास प्रारंभ होउन भगवान महावीर चौक पासून ते महात्मा फुले चौक, दिल्ली वेश, शिवाजी महाराज पुतळा, जयस्तंभ चौक या मार्ग मार्गस्थ होउन उपविभागीय प्रभारी महसुल अधिकारी धिरज मांजरे यांना निवेदन देण्यात आले. 

        यावेळी सकल जैन बांधवाचे प्रतिनिधी यांच्या सह महीला व पुरूष तसेच लहान मुला मुलीचा रॅलीमध्ये सहभाग हेाता. यांच्यासह श्री. श्वेतांबर जैन समाज संघटना, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, सकल जैन समाज समीती मधील समाज बांधवाची उपस्थिती हेाती. यावेळी जैन बघेळवाळ महीला मैत्री मंडळ,  महाराष्ट नवनिर्माण सेना, एम.आय.एम संघटना, व्दारकामाई संगीत महेफिल, ज्ञानसागर विचार मंच, विश्व हिंदु परीषद, यमुनाबाई सैतवाळ जैन संघ, विशेष सागर नेव्ही युवा मंच, पडमावती सेवा दल मडळ, तरून क्रांती मंच, माहेश्वरी समाज संघटना, सर्वधर्म आप्पकालीन संस्था, श्री गुरूदेव सेवाश्रम समिती आदी विविध सामाजिक संघटनानी पांठीबा देउन त्या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थिती हेाते. या मोर्चा दरम्यान सुंदलाल सावजी बॅकेकडून शरबतची व्यवस्था करण्यात आली होती. या रॅलीमध्ये तिन हजार पेक्षा जास्त जैन बांधवाचा सहभाग होता. 

    मोर्चा दरम्यान सकल जैन बांधवाकडून आपआपली प्रतिष्ठाने सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.  

        श्री सम्मेद शिखरजी या जैन समुदायाच्या तीर्थक्षेत्राला शिखरजी तीर्थक्षेत्राला पवित्र तिर्थक्षेत्र म्हणुन घोषीत करावे. या मागणी साठी कारंजात आयोजीत रॅली मध्ये सकल जैन समाजातील युवकांनी 108 फुटाचा ध्वज हातात घेउन रॅलीमध्ये सहभाग होता. तसेच कंकुबाई श्राविका आश्रमच्या मुलींचा सहभाग, महाविर ब्रम्हचारी आश्रमच्या विदयाथ्र्यी यांच्या सह शाळेकरी मुले मुली वेशभुषा परीधान करून रॅलीत सहभाग होता.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.