Header Ads

लीव ईन रिलेशनशीप हा प्रकार संस्कृतीला कलंक : वीरसागरजी महाराज - Live in relationship is a stigma on culture



लीव ईन रिलेशनशीप हा प्रकार संस्कृतीला कलंक : वीरसागरजी महाराज

वाशिम www.jantaparishad.com दि. २ : चार प्रकारच्या पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम मोक्ष हे प्रकार येतात. जे महापुरुष तिर्थंकार भगवान आहे. त्यांनी हे चारही पुरषार्थ केलेले आहेत. या मार्गावर चालले तरच मोक्ष मार्ग मिळत असतो. मोक्षप्राप्तीसाठी सर्वात प्रथम वैवाहीक जिवनाला महत्व आहे. त्या माध्यमातून चांगल्या संस्कारीक पिढीचे निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. मात्र आजची सुशिक्षीत पिढी पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या आहारी जात आहे. मोठ्या मेट्रोसिटीमध्ये लीव ईन रिलेशनशीप हा प्रकार सुरु झाला आहे. यामध्ये लग्न न करता संसार केल्या जातो हा प्रकार भारतीय संस्कृतीला कलंक आहे. ही भोग प्रवृत्ती त्यागून धर्म प्रवाहाला पुढे नेण्यासाठी चांगल्या संस्कारीक पिढीची उत्पत्ती होने जरुरी असल्याचे प्रतिपादन निर्यापक श्रमण मुनीश्री वीरसागरजी महाराज यांनी केले.

स्थानिक जुनी न.प. महावीर भवन येथे 2 जानेवारी रोजी आयोजित प्रवचनामध्ये त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी मंचावर मुनिश्री उत्कृष्टसागरजी महाराज, मुनीश्री विशाल सागरजी महाराज, मुनीश्री धवलसागरजी महाराज उपस्थित होते. यावेळी सामाजीक कार्यकर्ते तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी श्रीफळ अर्पण करुन आशिर्वाद घेतले. सोबतच देशभरातून आलेल्या विविध भक्तांनी श्रीफळ अर्पण केले. यावेळी वीरसागरजी महाराज पुढे म्हणाले की, जे पुरुषार्थ करतात तेच खरे साधू संत असतात. जर बिजाचे रोपण केले नाही, तर वटवृक्षाचे निर्माण होणार नाही. आजच्या युवा पिढीमध्ये वेगळ्या प्रकारची धारणा व भावना निर्माण झाली आहे. काही जण हम दो हमारे, तर काही जण हम दो हमारे एक या पर्यंत ही पिढी पोहचली असून, पुढे काही वर्षानंतर आपल्या परिवारात दिपकच राहणार नाही, अशा प्रकारच्या धारणा निर्माण होणार आहे. जर वंशाला कुलदिपक नसला तर तो वंश पुढे जाणार नाही. त्यामुळे कमीत कमी 4 संतान प्रत्येकाच्या परिवारात असने जरुरी आहे. शास्त्राच्या विधानासोबतच आचार्यश्री यांनीही हा संदेश दिला आहे. एका मुलावर संसार करणारे अनेक कुटूंब आज रडत असल्याचे प्रकार दिसत आहेत. कोरोना काळात असे अनेक एकुलते एक मुले असलेले कुटूंब त्यांच्या निधनामुळे उध्दवस्त झाले आहेत. सोबतच काही मुले आई वडीलांना सांभाळ करत नसल्याने वृध्दाश्रमामध्ये त्यांना सहारा घ्यावा लागला ही भिषणता अनुभवयला मिळत आहे. पूर्वी आपले आजोबा जुनी पिढी 6, 10 अशी संताने समाजाला देत होते त्याच्या मागे महत्वपूर्ण भूमीका होती. शुभविवाह च्या मागे शास्त्र व अर्थ आहे. धर्माच्या मार्गावर चालणारा शुभ विवाह असतो, भोगप्रवृत्तीसाठी केलेला विवाह अशुभ आहे. वेळेवर चांगले कार्य करा, भविष्यात धर्माला सुरक्षित राखण्यासाठी पुढाकार घ्या, आजच्या युवा पिढीने या विषयावर चिंतन करणे जरुरी आहे. भविष्याची चिंता करा, विषयाच्या वर उठा, पूर्वजांच्या संस्काराचे अनुकरण करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

सदर कार्यक्रमाला मंगलाचरण आदेश कहाते, संचालन रवि बज यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भावीक भक्त महिला उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.