Header Ads

७८ रक्तदात्यांनी केले रक्तदान ! - Blood donation camp - 78 donor donated blood

 

शिक्षण विभाग पंचायत समिती कारंजा व कारंजा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न 

७८ रक्तदात्यांनी केले रक्तदान !

        कारंजा दि १२ - "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व वाशिमचा रोप्य महोत्सव निमित्त" 'रक्तदान -श्रेष्ठदान' या तत्वानुसार क्रांतीज्योती सावित्री माता, राजमाता जिजाऊ  माॅं साहेब दशरात्रोत्सव व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त 12 जानेवारी 2023 ला शिक्षण विभाग पंचायत समिती कारंजा व कारंजा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह कारंजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात एकूण  78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला. 

    गटशिक्षणाधिकारी श्री श्रीकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली गट साधन केंद्र कारंजा येथील अधिकारी व कर्मचारी टीमने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार श्री धीरज मांजरे साहेब, प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी श्री पडघन साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री राठोड साहेब, विदर्भ कॅन्सर असो.श्री सुशील देशपांडे साहेब, मेडिकल असो. अध्यक्ष श्री आशिष बंड साहेब, श्री खंडारे शिविअ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.

        श्री माने  यांनी  कार्यक्रमाची प्रस्तावना करून, प्रमुख अतिथी श्री पडघन साहेब यांनी मार्गदर्शन केले .अध्यक्षांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाची सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्रीजायभाये यांनी केले. 


        तहसीलदार मांजरे साहेबांनी स्वतः रक्तदान शिबिराची सुरुवात केली कारंजा तालुक्यातील व मानोरा येथील अनेक शिक्षक व इतर इच्छुक यांनी रक्तदान केले .त्यापैकी श्री उमाकांत माहीतकर 35 वेळा .श्री शरद परसवार- श्री कंकुबाई कन्या हायस्कूल कारंजा 28 वेळा .श्री श्रवण किनीकर- विवेकानंद हायस्कूल कारंजा 25 वेळा .श्री विकास सोनटक्के जि प शाळा धोतरा जह 15 वेळा रक्तदान केल्यामुळे त्यांचे अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला .या शिबिराला डॉ. डोणगावकर, डॉ.सारडा, डॉ.काटोले, डॉ उगले, श्री शेखर बंग, श्री संजय भाऊ रुईवाले- सचिव श्री कंकुबाई कन्या हायस्कूल कारंजा यांनी सदिच्छा भेट दिली .

        कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता कारंजा रक्त चळवळ चे श्री प्रज्वल गुलालकरी ,सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा चे श्री श्याम  सवई व टीम ,रक्त संकलन अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कारंजा डॉ. स्वप्नील हागे व टीम, शेवट पर्यंत उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी पार पाडला. कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग व कार्यक्रमाचे आयोजन गट साधन केंद्र कारंजा येथील शिक्षण विस्तार अधिकारी, विषयतज्ञ ,समावेशित विषयतज्ञ, व विशेष शिक्षक यांनी  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले सर्व रक्तदाते व उपस्थितांकरिता नाष्टा व चहापान ची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कर्मचारी यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

No comments

Powered by Blogger.