Header Ads

शेतकऱ्यांनी नॉनो युरीयाचा वापर करावा - farmer should use nano urea

 
शेतकऱ्यांनी नॉनो युरीयाचा वापर करावा - farmer should use nano urea

वाशिम जिल्हयात युरीया खताचा साठा उपलब्ध

शेतकऱ्यांनी नॉनो युरीयाचा वापर करावा

कृषी विभागाचे आवाहन

      वाशिम, www.jantaparishad.com दि. 06 (जिमाका) : जिल्हयात रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकाच्या पेरण्या आटोपल्या आहे. यासोबतच जिल्हयात काही शेतकरी करडी, मोहरी, राजमा यासह भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गहू पिकासाठी युरीया खताची प्रचंड मागणी वाढली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी लागणारे रासायनिक खते जिल्हयातील कृषी केंद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी पोत्यातील युरीया खताऐवजी नॉनो युरीय खताचा वापर करावा. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.           

         जिल्हयात -

  • वाशिम तालुक्यातील 39 कृषी केंद्रात 442 मेट्रीक टन,
  • मालेगांव तालुक्यात 29 कृषी केंद्रात 211 मेट्रीक टन, 
  • रिसोड तालुक्यातील 24 कृषी केंद्रात 317 मेट्रीक टन, 
  • मंगरुळपीर तालुक्यात 25 कृषी केंद्रात 213 मेट्रीक टन, 
  • मानोरा तालुक्यात 21 कृषी केंद्रात 300 मेट्रीक टन
  • कारंजा तालुक्यात 35 कृषी केंद्रात 220 मेट्रीक टन 

युरीया खताचा साठा उपलब्ध आहे.

        पुढील कालावधीतील शेतकऱ्यांची युरीया खताची मागणी लक्षात घेता कृषी विभागाने युरीया खताच्या पुरवठयासाठी नियोजन केले आहे. पुढील आठवडयात कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, इफको व आरसीएफ या कंपन्यांचा 2500 मेट्रीक टन युरीया खताचा साठा उपलब्ध होणार आहे. इतर मिश्र व संयुक्त खते मुबलक प्रमाणात जिल्हयात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी पोत्यातील युरीया खताऐवजी लिक्वीड अर्थात द्रव्य स्वरुपातील नॉनो युरीय खताचा वापर केल्यास ते पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

         तरी शेतकऱ्यांनी नॉनो युरीया खताचा वापर करण्यावर भर दयावा. तसेच शेतकऱ्यांना युरीया खते जादा दराने विक्री होत असल्यास किंवा उपलब्धतेबाबत काही अडचणी व तक्रारी असल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी केले आहे.  

No comments

Powered by Blogger.