Header Ads

यशोगाथा - आचार्‍याचा मुलगा झाला विक्रीकर निरीक्षक - Digambar Vasanta Ingle - The Chef`s son became STI

यशोगाथा - आचार्‍याचा मुलगा झाला विक्रीकर निरीक्षक -  Digambar Vasanta Ingle - The Chef`s son became STI


यशोगाथा - आचार्‍याचा मुलगा झाला विक्रीकर निरीक्षक

वाशीम जिल्ह्यातील साखरा गावाचे नाव केले उज्वल

        वाशीम दि २७ - अल्पभूधारक शेतकरी व आचारी अशी तालुक्यात ओळख असलेल्या वसंता इंगळे यांनी हलाकीच्या परिस्थितीवर मात करीत अल्पभूधारक शेतकरी असूनही  सतत च्या नापिकी मुळे कंटाळून स्वता  मधील (पाककला) स्वयंपाक करण्याची मुळ कला जोपासून गेली अनेक वर्षांपासून गावातील व तालुक्यातील जेवणाचे छोटे-मोठे ठेके घेत स्वता आचारी म्हूणन काम करीत आपल्या कुटुंबाचा उधरनिर्वाह करून दोन मुलाला आणि एका मुलीला उच्च शिक्षण देत थोरल्या मुलाला एमपिएसएसी परीक्षा स्पर्धेत विक्रीकर अधिकारी बनवून समाजापुढे एक आदर्श घडवून दिला.

        साखरा ता. वाशीम येथील अल्पभूधारक शेतकरी व सध्या स्थित आचारी म्हणून तालुक्यात काम करणारे वसंता इंगळे व पत्नी भागीरथीबाई वसंता इंगळे हे दोघे मिळेल ते काम व शेतमजूरी करून आपले कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात तर वसंता इंगळे यांच्या मजुरीतून मोठा मुलगा व पत्रकार गजानन भोयर यांचा भाचा (जावई) डिगांबर इंगळे याला उच्च शिक्षण देत एमपीएससी स्पर्धातुन (STI) विक्रीकर निरीक्षक बनवित लहान मुलगा गोपाल इंगळे  हा बी ए होऊन एका मेडिकल वर पार्ट टाईम जॉब करतो तर मुलगी सिमा इंगळे हि महाविध्यालयात शिक्षण घेत असून वडील वसंता इंगळे हे आज स्थित आचारी म्हणून मोल मजुरी करतात. त्यांचा मोठा मुलगा विक्रीकर अधिकारी म्हणून त्याची निवड झाली म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्याचे कौतुक होतं आहे.

No comments

Powered by Blogger.