Header Ads

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२२-२०२३ आयोजित - B G Deshmukh Varshik Nibandh Spardha 2022-23

B G Deshmukh Warshik Nibandh Spardha 2022-23 : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२२-२०२३ आयोजित


भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२२-२०२३ आयोजित 

        मुंबई, दि. 9 - भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा या संस्थेतर्फे श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२२-२०२३ (B G Deshmukh Varshik Nibandh Spardha 2022-23) आयोजित करण्यात आली आहे.

        या स्पर्धेसाठी नेतृत्व आणि समाजात विकसित होत असलेली महिलांची भूमिका, महाराष्ट्रातील नागरी प्रशासनात झालेले बदल व आव्हाने हे दोन विषय आहेत

        निबंध हा कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावा. तसेच तो ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा, निबंध विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहून चार प्रतीत मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ या पत्त्यावर दि. २८.२.२०२३ सादर करावा, स्पर्धकाने निबंधावर आपले नांव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये. निबंधाच्या प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नांव (मराठी व इंग्रजीतून) टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल पत्ता नमूद करून पाठवाव्यात. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेची  सविस्तर माहिती https://www.iipamrb.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे भारतीय लोक प्रशासन संस्थेने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.