Header Ads

सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार - apmc election - any farmer can contest

सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार - apmc election - any farmer can contest


सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार

राज्य मंत्रिमंडळचा निर्णय

apmc election - any farmer can contest

  मुंबई www.jantaparishad.com दि.१७ - आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक (APMC Election) लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे.

या अधिनियमाच्या 13 (1)(अ) या कलमामध्ये सुधारणा करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या सुधारणेमुळे कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविता येईल.

No comments

Powered by Blogger.