Header Ads

अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक २०२२ मतदान संपन्न - Amravati University Senate Election 2022 Voting Completed

Amravati University Senate Election 2022 Voting Completed - अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक २०२२ मतदान संपन्न

अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक २०२२

कारंजा येथे पदवीधर गटासाठी ३८२ पैकी १७२ मतदारांनी हक्क बजावला 

आज मतदान संपन्न - २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी

        कारंजा www.jantaparishad.com दि २० नोव्हेंबर - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी ५ या वेळात स्थानिक कि न महाविद्यालय येथे मतदान घेण्यात आले. पदवीधर गटासाठी असलेल्या १० जागांसाठी एकूण ३८२ मतदारांपैकी १७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यामध्ये ६३ मतदान केंद्र यासाठी निश्चित करण्यात आले होते. 

२२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी

        दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून विद्यापीठ परिसरातील वनस्पतीशास्त्र विभाग व ज्ञानस्त्रोत केंद्रातील अभ्यासिका सभागृहामध्ये मतमोजणीचे कार्य सुरु होणार आहे. यासाठी ८ गटांची निवड करण्यात आली असून कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या नियंत्रणाखाली मतदान व मतमोजणी होणार आहे.

३७ जागांसाठी २०६ उमेदवार निवडणूक रिंगणात

        निवडणुकीत ३७ जागांसाठी २०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नुटा, शिक्षण मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जस्टीस पॅनल, शिवसेना, प्राचार्य फोरम सह अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.   

        अमरावती विद्यापीठ सिनेट मध्ये पुढील प्रमाणे ४४ सदस्य असतात. 

Amravati University Total  Senate Members 

  • महाविद्यालयीन प्राचार्य - १०
  • संस्था चालक प्रतिनिधी  - ६
  • संचालक प्रतिनिधी - १०
  • विद्यापीठ शिक्षक - ३
  • विद्वत परिषद - २
  • परीक्षा मंडळ - ३ 
  • पदवीधर - १०

        विविध प्राधिकारिणीसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या 

    Amravati University Senate Election Total Voters 

    • प्राचार्य - ११९, 
    • महाविद्यालयीन शिक्षक - ३४१३, 
    • व्यवस्थापनाचे प्रतिनिधी - २३९, 
    • विद्यापीठ शिक्षक - ५९, 
    • अभ्यास मंडळामध्ये सर्व विद्याशाखेमध्ये - १०५५ 
    • पदवीधर मतदार - ३५,६५९, 

    अशी आहे.

    No comments

    Powered by Blogger.