Header Ads

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ वाशिम जिल्ह्यातील एकुण मतदार - Amravati Graduate constituency Washim District Voters

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ वाशिम जिल्ह्यातील एकुण मतदार - Amravati Graduate constituency Washim District Voters


अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ

मतदार नोंदणी कार्यक्रम : प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

९ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारणार     

       वाशिम, दि. 25 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार संघाची मतदार यादया तयार करण्याच्या सुधारीत सर्वसमावेशक सुचना दिल्या आहे. त्यानुसार अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघा (Amravati Graduate constituency) साठी नव्याने मतदार यादया तयार करण्यात येत आहे. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांचा पुनरिक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी करण्यात आली आहे.

  वाशिम जिल्ह्यातील तालुकानिहाय एकुण मतदार संख्या 

Amravati Graduate constituency Washim District Voters

         प्रारुप मतदार यादीतील मतदार संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. 

मालेगांव तालुका - पुरुष 647, स्त्री- 125  एकूण 772, 

रिसोड तालुका - पुरुष 991, स्त्री - 209 एकूण 1200, 

वाशिम तालुका - पुरुष 1591,स्त्री - 474 एकूण 2065, 

मंगरुळपीर तालुका - पुरुष 873, स्त्री - 267 एकूण 1140, 

कारंजा तालुका - पुरुष 1479,स्त्री - 726 एकूण 2205 व 

मानोरा तालुका - पुरुष 357, स्त्री - 112 असे एकूण 469 

  वाशिम जिल्हयातील (Washim District Voters) पुरुष मतदारांची संख्या 5938 आणि स्त्री मतदार 1913 असे एकूण 7851 मतदारांची संख्या आहे. 

           दावे व हरकती 9 डिसेंबर 2022 पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे. 30 डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप महाजन यांनी दिली.        

No comments

Powered by Blogger.