Header Ads

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा यांच्या पथकाने केली कारवाई - Action by SDPO Karanja lad office against Gutkha

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा यांच्या पथकाने केली कारवाई - Action by SDPO Karanja lad office against Gutkha

कारंजा तालुक्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

एकूण ०७.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा यांच्या पथकाने केली कारवाई 

        कारंजा (www.jantaparishad.com) दि २७ - उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा यांच्या पथकाने अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर केलेल्या धडक कारवाईत एकूण ०७.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Action by SDPO Karanja lad office against Gutkha) समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कारवाया सुरु असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंध घालण्याकरिता जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.

        त्या अनुषंगाने दि. २६.११.२०२२ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा यांच्या पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा पो.स्टे. कारंजा ग्रामीण हद्दीत  ७,३३,३३५ /- रुपयांचा गुटखा जप्त केला. कारंजा ग्रामीण हद्दीतील ग्राम पलाना व दुघोरा येथे वेगवेगळ्या ०३ ठिकाणी छापा टाकला असता ग्राम पलाना येथील १) इब्राहिम किराणा व महेबुब अजिस खान पठाण याचे राहते घरातील छाप्यात ०३ आरोपींसह (०२ फरार) ५९९१८०/- रुपयांचा मुद्देमाल, तसेच ग्राम दुघोरा येथे २) उमेश विष्णुपंत गुल्हाणे यांचे घरातील छाप्यात ०१ आरोपीसह अंदाजे ७०००/- रुपयांचा मुद्देमाल, ३) प्रफुल विष्णुपंत गुल्हाणे यांचे घरातील छाप्यात ०२ आरोपीसह (०१ फरार) अंदाजे १२७१५५/- रुपयांचा मुद्देमाल असे एकूण ०५ आरोपीसह (०२ फरार) अंदाजे रुपये ०७,३३,३३५ /- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नामे १) महेबुबखान अजिसखान पठाण वय वय ३३ वर्ष रा. पलाना २) उमेश विष्णुपंत गुल्हाणे वय ३८ वर्ष रा. दुघोरा व ३) प्रफुल विष्णुपंत गुल्हाणे वय ३३ वर्ष रा. दुघोरा यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यातील उर्वरित ०२ आरोपी फरार आहेत. आरोपींवर पो.स्टे. कारंजा ग्रामीण येथे गुन्हे दाखल केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) (Washim SP Shri Bachchan Singh) यांचे मार्गदर्शनात कारंजा चे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जगदीश पांडे (Shri Jagdish Pande Karanja Lad SDPO) यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कारंजा येथील पोहवा / १६५ विनायक देवधर, पोना/ ११३० अमोल कानडे, मपोना/१९ अनिता गोंधळी, पोशि/७१२ चंद्रकांत वाळके, चापोशि/१०१२ शरद सोनीकर तसेच पो. ठाणे कारंजा शहर येथील पोना / १०४९ गणेश नागरीकर व पोना / ८२० सुरज खडके या  पथकाने पार पाडली.

        श्री.बच्चन सिंह (IPS) पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन केले आहे.

No comments

Powered by Blogger.