Header Ads

वाशिम जिल्ह्याची हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे जाहीर - washim district hangami paisewari jahir


वाशिम जिल्ह्याची हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे जाहीर - washim district hangami paisewari jahir

वाशिम जिल्ह्याची हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे जाहीर 

        वाशिम दि.०२ www.jantaparishad.com (जिमाका) सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ५४ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत.यातील १४८ गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.तर ६४५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आढळून आली आहे. 

  1. Washim Taluka वाशिम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत.या सर्व १३१ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे.
  2.  Malegaon Taluka मालेगाव तालुक्यातील १२२ गावांपैकी १०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आणि १४ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे. 
  3. Risod Taluka रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून त्यापैकी ४० गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आणि ६० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
  4.  Mangrulpir Taluka मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
  5. Karanja Lad Taluka कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
  6. Manora Taluka मानोरा तालुक्यात १३६ गावे आहे.या १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.

एकूण जिल्ह्यातील खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे इतकी आढळून आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.