Header Ads

स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण : ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले : Self-Employment Development Training

स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण : ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले : Self-Employment Development Training


 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र,वाशिम

स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण : ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

        वाशिम,दि. 03 www.jantaparishad.com (जिमाका) - औद्योगिक संस्थेचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)जिल्हा उद्योग केंद्र,वाशिम (DIC Washim) च्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी 12 ते 17 ऑक्टोबर दरम्यान स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण (Self-Employment Development Training) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

      प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश उद्योजकतेचे सुप्त गुण असलेल्या युवक व युवतींना शोधून त्यांच्या मधील सुप्त उद्योजकीय गुणांचा आखलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून विकास करून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा आहे.प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध उद्योग संधी विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणात गृह उद्योग, लघु उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, गाय व म्हैस पालन, कुक्कुटपालन इत्यादी प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योजकता प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधी शोधणे,उद्योग व्यवसायाची उभारणीचे विविध टप्पे, उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, विविध शासकीय कर्ज योजना कर्ज प्रकरण प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेचे व्यवहार हिशोब लेखे इत्यादीबाबत तज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहे. 

           तरी प्रशिक्षणार्थी किमान 7 ची पास व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार निर्माण करू इच्छिणाऱ्या १८ ते ५० वयोगटातील युवक-युवती व महिलांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे तांत्रिक प्रशिक्षक पुरुषोतम ठोंबे (९८२२१०८०२३) किंवा कार्यक्रम आयोजक खुशाल रोकडे यांच्याशी ११ ऑक्टोबरपर्यंत संपर्क करावा. असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.