Header Ads

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन - Nari Shakti Puraskar Award Proposals

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -  Nari Shakti Award Puraskar Proposals


नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

        मुंबई, दि: 01 : सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारा (Nari Shakti Puraskar / Award) साठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी  केले आहे.

        हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री शक्ती पुरस्कारांसह) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय दि. 1 जुलै 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे. (दिव्यांग व्यक्तीचे वय दि. 8 मार्च 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे)

        नारी शक्ती पुरस्कार उत्कृष्ट कार्यासाठी शक्यतो अपवादात्मक परिस्थितीत, महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण किंवा या विषयाशी संबंधित किंवा अनुषंगिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रदान केला जाऊ शकतो. ज्यांनी महिलांना निर्णय घेण्याच्या भूमिकेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले, पारंपरिक आणि अपारंपरिक क्षेत्रात महिलांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले, ग्रामीण महिलांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, महिलांना गैर – पारंपरिक क्षेत्र जसे की विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती, सुरक्षितता, आरोग्य आणि निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर आणि प्रतिष्ठा इत्यादींच्या दिशेने ठोस आणि लक्षणीयरित्या प्रोत्साहन दिले अशा व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली जाऊ शकते. एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला देखील हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. ज्याने बाल लिंग गुणोत्तर (CSR) मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केल्यावर मृत्यू झाल्याची प्रकरणे वगळता सामान्यतः पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार नाही. वरीलप्रमाणे कार्य केलेल्या व्यक्ती, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या www.narishaktipuraskar.wcd.gov.in किंवा www.wcd.nic.in  या संकेतस्थळा (website) वर दि 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. हे प्रस्ताव फक्त ऑनलाईन (Online) द्वारेच स्वीकारले जातील, असे मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.