Header Ads

भाजपाचे जेष्ठ नेते नरेंद्र गोलेच्छा राजकारणात पुन्हा सक्रिय होणार ! - Narendra Golechha karanja lad BJP's senior leader will be active again in politics!

नरेंद्र गोलेच्छा भाजपाचे कारंजा लाड चे जेष्ठ नेते राजकारणात पुन्हा सक्रिय होणार ! : Narendra Golechha karanja lad BJP's senior leader will be active again in politics !

भाजपाचे जेष्ठ नेते नरेंद्र गोलेच्छा राजकारणात पुन्हा सक्रिय होणार !

 निष्ठांवंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

        कारंजा www.jantaparishad.com दि.१९ -  भाजपचे जेष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा (Narendra Golechha BJP's senior leader) शहर विकासासाठी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. कारंजा शहर आणि तालुक्यात अत्यंत सुरवातीचे काळापासून भाजपा ला वाढविण्याचे कार्य त्यांनी केले. मध्यंतरीचा काही काळ ते राजकारणापासून दूर होते. मात्र आपलेवर प्रेम करणारे आणि निष्ठांवंत कार्यकर्ते यांच्यात त्यांच्या या अलिप्ततेबाबत नाराजी प्रकट होत होती. कार्यकर्त्यांची ही नाराजी दूर करणेसाठी तसेच कारंजा शहराचे विकासासाठी खूप विचाराअंती आपण पुन्हा राजकीय क्षेत्रात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे निष्ठांवंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येते आहे.

         याबाबत अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले कि, "मी गेल्या ४० वर्षे पुर्वी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणुन कारंजा शहरात माझ्या राजकिय जीवनास सुरुवात केली.  कारंजा वासीयांनी माझ्यावर भरभरून प्रेम करीत मला व माझ्या परिवारास तीन वेळा कारंजा शहराचे नगराध्यक्ष म्हणून स्विकारले या बद्दल मी शहर वासियाचा ऋणी आहे. मागील पाच सहा वर्षी पासुन मी सकिय राजकारंणा पासुन अलिप्त राहात राजकिय विश्राती घेत असताना माझ्यावर प्रेम करणारे मला मानणारे असो वा निष्ठावन कार्यकर्ते असो याना माझा निर्णय योग्य वाटत नव्हता. ते माझ्या कडे सतत नाराजी प्रगट करित होते. त्याचे नाराजीचा विचार तसेच शहराचा विकास कारंजा शहराची सस्कृती जी दिवसेन दिवस रास पावत आहे यावर मागील एक वर्षा पासून विचार करून मी कारंजेकरांचे माझ्यावर असलेला प्रेमापोटी, मी सक्रिय राजकारणात परतीचा निर्णय घेतला असुन कारंजा नगर परिषद निवडणुक शहर वासियांच्या सहकार्याने पूर्ण लढविण्याचा निर्णय आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी केलेला आहे." 

No comments

Powered by Blogger.