Header Ads

साप्ताहिक कारंजा वृत्तकेसरी च्या "दीपोत्सव २०२२" दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न - Karanja vruttkesari dipotsav 2022



साप्ताहिक कारंजा वृत्तकेसरी च्या "दीपोत्सव २०२२" दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न     

         कारंजा : (प्रतिनिधी) दि.२७ - कारंजातील साप्ताहिक कारंजा वृत्तकेसरी च्या दिवाळी अंकाचे (पुस्तक) प्रकाशनाचा सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

 स्थानिक कारंजा नागरी सह पत संस्थेच्या सहकार भवन मध्ये दिवाळी अंकाच्या पुस्तकाचा प्रकाशनाचा सोहळा दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ ला दुपारी ३ वाजता विविध मान्यवारांच्या हस्ते पार पडला. या प्रकाशन सोहल्याच्या अद्यक्षस्थानी दै देशोन्नति चे जेष्ठ पत्रकार गोपाल पाटील भोयर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून   नरेंद्र गोलेच्छा माजी नगराध्यक्ष,आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक कारंजा पो स्टे., पत्रकार संघाचे माजी अद्यक्ष सुधाकर गर्जे,श्रीनिवास जोशी सर, मंगलाताई नागरे जेष्ठ साहित्यिक, मिनाताई काळे सामाजिक कार्यकर्त्य तसेच सा कारंजा वृत्तकेसरी चे मुख्य संपादक रामदास मिसाळ आदिची मंचकावर उपस्थिति लाभली होती .

 सर्वप्रथम मान्यवरांनी पत्रकारीतेचे आद्यजनक बाळ शास्त्री जंभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व द्विपप्रज्वलंन करून कार्यक्रमाला सुरुवात केली

  दरम्यान सर्व मान्यवरानी कारंजातील साप्ताहिक वर्तमान पत्रा च्या इतिहासात  साप्ताहिक कारंजा वृत्तकेसरी चे "दीपोउत्सव २०२२" हे पुस्तक स्वरूपातील पहिला दिवाळी अंक असल्याचे मनोगत व्यक्त केलीत. या कार्यक्रमाला शहरातील सर्वच पत्रकार बांधवांनी सर्व चाहत्यांनी आपली उपस्थिती दिली होती हे विशेष. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य संपादक रामदास मिसाळ यांनी केले तर संचालन पत्रकार हेमंत पापळे सर यांनी केले तर कार्यक्रमा चा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन अमित संगेवार यांनी केले.

No comments

Powered by Blogger.