Header Ads

वाशिम जिल्ह्यातील "कॅच द रेन" मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा - Catch the rain : Washim District News - District Collector reviewed

Catch the rain : Washim District News : District Collector reviewed - वाशिम जिल्ह्यातील "कॅच द रेन" मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

वाशिम जिल्ह्यातील "कॅच द रेन" मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा 

वाशिम दि.१० (जिमाका) - केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या  " कॅच द रेन " (Catch the rain) मोहिमेचा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज १० ऑक्टोबर रोजी वाकाटक सभागृहात आयोजित सभेत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत (Washim ZP CEO Vasumana Pant) व उपवनसंरक्षक शैलेश मीणा यांची प्रमुख उपस्थिती होती.

        श्री.षण्मुगराजन म्हणाले, विविध यंत्रणांनी या मोहिमेंतर्गत जी कामे केली आहेत,ती कामे संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात यावी. प्रत्यक्षात झालेली कामे व अपलोड केलेली कामे यामध्ये तफावत दिसू नये. झालेली कामे ऑनलाईन ऑफलाईन भरण्यात यावी. ३० नोव्हेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे झालेली कामे तातडीने पोर्टलवर अपलोड करावी. ज्या यंत्रणांना काम पूर्ण करण्याचे जे उद्दिष्ट देण्यात आले आहेत ते ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे. ज्या यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही, त्यांनी तातडीने वृक्ष लागवडीची कामे करून आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

     सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रीमती नानोटकर यांनी आतापर्यंत " कॅच द रेन " मोहिमेअंतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली.या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात यंत्रणांनी बाबनिहाय १ लाख ३१ हजार ६१० कामे आणि वृक्ष लागवडीची १० लक्ष २४ हजार १५३ कामे अशी एकूण ११ लक्ष ५५ हजार ७६३ कामे केल्याचे त्यांनी सांगितले.    

          सभेला उपस्थित यंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक एस.एस.कडू,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री.लोखंडे,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के.वानखेडे,जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. खारोडे,यांचेसह सर्व गटविकास अधिकारी,सर्व तालुका कृषी अधिकारी व काही नगरपालिका/ नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.