Workshop of MSME Dept on 10th September - एमएसएमई विभागाची १० सप्टेंबरला कार्यशाळा

MSME - micro, small and medium enterprises


एमएसएमई विभागाची १० सप्टेंबरला कार्यशाळा

उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे

Workshop of MSME Department on 10th September

वाशिम दि.७ (जिमाका) भारत सरकारच्या सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योजकता विभाग अर्थात एमएसएमई विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी १० सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वाशिम येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला संबंधित विभागाचे केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

             या प्रशिक्षण कार्यशाळेला जिल्ह्यातील लघु उद्योजक,उद्योजक व नवीन उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा.इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव कार्यशाळेला येताना सोबत आणावे. ज्या विभागामार्फत केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे, त्या संदर्भात निधी उपलब्धता/ प्रस्ताव मंजुरी प्रलंबित असल्यास त्याबाबत संबंधित विभागामार्फत केलेल्या पत्र व्यवहाराच्या प्रती सोबत आणाव्यात. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...