पत्नीने पतीला कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणे म्हणजे क्रूरताच - छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय wife abusing her husband is cruelty
पत्नीने पतीला कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणे म्हणजे क्रूरताच
छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय
रायपूर दि ०१ - पत्नी पीड़ित पती (patni pidit pati) हा प्रकार आजच्या समाजात मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येतो आहे. अशाच एका प्रकरणात पत्नीने वारंवार पतीच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणे (wife abusing her husband), त्याचा अपमान करणे आणि पतीच्या सहकार्यांसमोर एक सीन (देखावा) तयार करणे हे पतीला घटस्फोट घेण्यास पात्र ठरणारी क्रूरता आहे, असे छत्तीसगड हायकोर्टाने नलिनी मिर्शा विरुद्ध सुरेंद्र पटेल या खटल्याची सुनावणी करताना म्हटले आहे. शिवाय या प्रकरणात पत्नीने केलेल्या अनैतिक संबंधांच्या आरोपांबाबत न्यायालयाने सांगितले की, अशा आरोपांना पुष्टी देण्यासाठी पत्नीच्या तोंडी विधानाशिवाय कोणताही पुरावा नाही. न्यायालयाने पिडित पतीच्या (pidit pati) बाजूने निकाल दिला आहे.
न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर पत्नीच्या क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्या महिलेने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी सुरू होती. पत्नी नवर्याच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करत सीन (देखावा) तयार करत असे, असे प्रस्थापित झाले आहे. अशा स्थितीत जेव्हा पत्नी पतीच्या कार्यालयात जाते, त्याला शिवीगाळ करते आणि त्याच्यावर काही नात्याचा आरोप करते. स्वाभाविकच तेव्हा सहकार्यांसमोर पतीची प्रतिमा मलिन होऊन कार्यालयातील त्याची प्रतिष्ठा देखील कमी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर पत्नीच्या क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्या महिलेने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी सुरू होती. पत्नी नवर्याच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करत सीन (देखावा) तयार करत असे, असे प्रस्थापित झाले आहे. अशा स्थितीत जेव्हा पत्नी पतीच्या कार्यालयात जाते, त्याला शिवीगाळ करते आणि त्याच्यावर काही नात्याचा आरोप करते. स्वाभाविकच तेव्हा सहकार्यांसमोर पतीची प्रतिमा मलिन होऊन कार्यालयातील त्याची प्रतिष्ठा देखील कमी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आपल्या पतीचे एका महिला सहकार्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करणारी पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार ही क्रूरता आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. कोणत्याही पुराव्याशिवाय महिला सहकार्याशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणास्तव पतीची बदली करावी, अशी मंत्र्याकडे तक्रार करणे ही क्रूरता आहे, असे या निकालात देखील म्हटले आहे. तसेच न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, जिथे पतीला घटस्फोट मंजूर केला होता.
दरम्यान, या जोडप्याचे 2010 साली लग्न झाले होते आणि त्यांनी एका मुलालाही जन्म दिला आहे. प्रतिवादी पतीने असा आरोप केला होता की, पत्नी स्वत:च्या आवडीनुसार पैसे खर्च करते आणि माझ्या पालकांना भेटायला जाण्यावर आक्षेप घेते. पतीने पुढे आरोप केला आहे की, पत्नी त्याचा संपूर्ण पगार काढून घेते आणि तोच आपल्या व्यवसायात खर्च करते. खर्चाबाबत काही विचारणा केली असता, त्याला शिवीगाळ करण्यात आली. पतीच्या संमतीशिवाय पत्नीने कर्जावर 5 वाहने घेतली आणि मुलाच्या संगोपनासह घरातील जबाबदार्या पार पाडण्यासाठी ती जाणीवपूर्वक टाळाटाळ करते, असा आरोपही करण्यात आला. नंतर पतीवर इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही तिने सुरू केला. त्यानंतर पतीने क्रूरतेचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज केला.
कौटुंबिक न्यायालयाने तथ्ये आणि पुरावे तपासल्यानंतर याचिका मंजूर करत पतीला घटस्फोट दिला. विशेष म्हणजे पत्नीच्या एका बहिणीने तिच्याविरोधात आणि बहिणीच्या पतीच्या बाजूने कोर्टात साक्ष दिली. या आदेशाविरोधात पत्नीने सध्याचे अपील दाखल केले होते. पत्नीच्या वकिलाने असे म्हटले की, कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला तिच्या पतीने क्रूरपणे वागणूक दिली आहे. पतीने तिच्यावर क्रूरता दाखवली आणि घटस्फोट घेण्यासाठी खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात आला. पुढे असे सादर करण्यात आले की, पत्नीला मुलासह पतीसोबत राहायचे होते परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने पती पत्नीसोबत राहू इच्छित नाही. पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असून पत्नीला पतीच्या पैशात रस असल्याचा पतीचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.
Post a Comment