Header Ads

सेवा पंधरवड्यात नागरिकांचे अर्ज व तक्रारी निकाली काढा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Washim DM order For Seva Pandharwada : Clear all the public application and complaints

सेवा पंधरवड्यात नागरिकांचे अर्ज व तक्रारी निकाली काढा -  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,Washim DM order For Seva Pandharwada : Clear all the public application and complaints


सेवा पंधरवड्यात नागरिकांचे अर्ज व तक्रारी निकाली काढा 

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे निर्देश 

         वाशिम,दि.१४ (जिमाका) विविध विभागाकडे नागरिकांचे प्रलंबित असलेले सर्व अर्ज व तक्रारी सेवा  पंधरवड्या (Seva Pandharwada) दरम्यान निकाली काढावीत असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले.

       आज १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्ताने आयोजित सभेत श्री.षन्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ,महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      श्री षन्मुगराजन म्हणाले,विविध विभागाकडे १० सप्टेंबरपर्यंत आलेले ऑनलाईन व प्रत्यक्ष आलेले सर्व अर्ज व तक्रारी या पंधरवड्यादरम्यान निकाली काढाव्यात.ज्या विभागाकडे या पंधरवड्यादरम्यान अर्ज निकाली काढण्यात आली नाही,त्याबाबतची कारणे लेखी स्वरूपात द्यावी लागणार आहे.त्यामुळे यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे.या पंधरवड्यादरम्यान नागरिकांचे अर्ज निकाली काढण्यासाठी संबंधित विभागाने एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. कोणकोणत्या विभागाकडे किती प्रलंबित अर्ज आहे हे लेखी स्वरूपात कळवावे.पंधरवड्यादरम्यान निकाली काढण्यात आलेल्या अर्जाची माहिती गुगल शीटमध्ये भरावी.त्यामुळे ती वेळीच शासनाकडे पाठवता येईल. ज्या सेवा ऑफलाईन आहेत त्या सुद्धा या पंधरवड्यात केलेल्या अर्जानुसार उपलब्ध करून द्याव्यात.ई- केवायसीची कामे पूर्ण करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

       आयोजित करण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्या बाबतची माहिती श्री. हिंगे यांनी दिली. आपले सरकार पोर्टल, महावितरण पोर्टल, डिबीटी पोर्टल,नागरिक सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा, विभागाच्या स्वतःच्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज व या व्यतिरिक्त १४ सेवांशी प्रलंबित जनतेची अर्ज व तक्रारींचा निपटारा संबंधित यंत्रणेला करायचा असल्याचे श्री.हिंगे यांनी सांगितले.

             सभेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. राऊत, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वानखडे,उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख,सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.