Header Ads

उसतोड कामगारांनी ग्रामपंचायतकडे नोंदणी करावी - Sugar cane workers should register with Gram Panchayat

उसतोड कामगारांनी ग्रामपंचायतकडे नोंदणी करावी - Sugar cane workers should register with Gram Panchayat


उसतोड कामगारांनी ग्रामपंचायतकडे नोंदणी करावी

समाज कल्याण विभागाचे आवाहन

     वाशिम, दि.26 (जिमाका) :  उसतोड  करणाऱ्या  कामगारांना  उसतोडणीच्या कामासाठी  पर्यायाने रोजगारासाठी  बाहेर जिल्ह्यात जावे  लागते. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असते. त्यांच्या जीवनात स्थैर्य येवून जीवन सुखकारक करुन त्यांचे जीवनमान उंचावून सुरक्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी  गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. उसतोड कामगारांची नोंदणी करतांना त्यांना उसतोड कामगार असल्याबाबत ओळखपत्र देण्यात येते.

          उसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे व जे सतत मागील तीन वर्षे उसतोड कामगार म्हणून करीत आहेत, त्यांनी संबंधित ग्रामपंचायतमध्ये  ग्रामसेवक यांचेकडे नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

शेंदोना येथे 21 उसतोड कामगारांची नोंदणी

    जिल्हयातील उसतोड कामगारांना  शासनाच्या  विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी  उसतोड  कामगारांची  नोंदणी  करुन  त्यांना ओळखपत्र  देण्यासाठी  24 सप्टेंबर रोजी  मानोरा तालुक्यातील  शेंदोना येथे उसतोड कामगार  नोंदणी  शिबीरचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २१ ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आली.  


No comments

Powered by Blogger.