Header Ads

निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा : Nikshay Mitra : Registration

Nikshay Mitra : Registration : निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान : क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी


प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान 

 क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी 

निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा

      वाशिम, दि. 26 (जिमाका) : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन २०२५ पर्यंत " क्षयरोग मुक्त भारत " उद्दिष्टपूर्तीसाठी या योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य हा आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. ज्याव्दारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक सहकारी, उद्योगक्षेत्र, निवडून आलेले लोकप्रतिनिधी, वैयक्तिक, सामाजिक संस्था क्षयरुग्णांना सहाय्य देऊन मदत करुन आपण निक्षय मित्र (Nikshay Mitra) बनू शकतो.

         9 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला आहे. यामध्ये निक्षय मित्र बनून त्यांच्यावतीने क्षयरुग्णांना 1 ते 3 वर्षासाठी कोरडा आहार पुरविण्यात येऊ शकतो. जिल्हयात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाला सहकार्य करुन प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत निक्षय मित्र बनवून सहकार्य करावे. जिल्हयात साई प्रसाद मेडिकल मंगरुळपीर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे व जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे यांनी जिल्हयातील रुग्णांना दत्तक घेऊन जिल्हयातील पहिले निक्षय मित्र होण्याचा मान मिळविला आहे. जिल्हयात आतापर्यंत दहा निक्षय मित्रांनी नोंदणी केली आहे.

         तरी या मोहिमेमध्ये आपण तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहाय्य म्हणून सहभाग नोंदवावा. सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन अथवा dtomhwsm@rntcp.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येईल किंवा https://communitysupport.nikshay.in या संकेतस्थवर लॉगीन करुन निक्षय मित्र  (Nikshay Mitra)  म्हणून नोंदणी (Registration) करता येईल. असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.