Header Ads

१९ सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन : Mahila Lokshahi Din on 19 September

१९ सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन : Mahila Lokshahi Din on 19 September


19 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन

           वाशिम, दि. 16 www.jantaparishad.com (जिमाका) :   समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. त्यांच्या तक्रारी/ अडचणी यांचे शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावरील महिला लोकशाही दिन (Mahila Lokshahi Din) संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. 

        सप्टेंबर महिन्यात महिला लोकशाही दिन 19 सप्टेंबर रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी (District Women and Child Development Officer in charge Priyanka Gawli) यांनी दिली.  

No comments

Powered by Blogger.