Header Ads

केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा भक्ती गीत keshava madhava lyrics in marathi : bhakti geet

केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा keshava madhava lyrics in marathi bhakti geet


केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

Keshava Madhava Lyrics in Marathi 


केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा 

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा 

केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा .....1

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाइ हाकशी, गोकुळी यादवा

केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा......2

वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेउन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा, पळविशी कौरवा

केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा.....3

केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा 

No comments

Powered by Blogger.