Header Ads

२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान फिट इंडिया फ्रिडम रन - Fit India Freedom Run from 2nd to 31st October

Fit India Freedom Run from 2nd to 31st October : २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान फिट इंडिया फ्रिडम रन


2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान फिट इंडिया फ्रिडम रन  

       वाशिम, दि. 30 (जिमाका) : फिट इंडिया फ्रिडम रन 3 कि.मी. धावणे या उपक्रमाचे आयोजन युवा व खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या पुढाकारातून 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्हयात करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने फिट इंडिया फ्रिडम रन (Fit India Freedom Run) उपक्रम पुढिल प्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मादिनानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने फिट इंडीया फ्रिडम रन 3 कि.मी. धावणे हा उपक्रम जिल्हयात व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे.

         2 ऑक्टोबर रोजी प्लॉग रन आयोजित करून स्वच्छता आणि तंदुरुस्ती अशा दोन्ही बाबी साध्य करावयाच्या आहेत. पळणे/ जॉगिंग करत करत धावणे या वेळी रस्त्यात दिसणारा हाताने उचलता येईल असे कागदाचे कपटे/ कचरा उचलुन कचऱ्याच्या पिशवीत गारबेग बॅगमध्ये गोळा करुन स्वच्छता करण्यात येणार आहे. घरात बसुन कामकाज करणारे युवक- युवती, नागरीक व गृहीणी या सर्वांना देखील फ्रीडम रन या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ऑलिम्पियन खेळाडूंची टॉर्च रॅली आयोजित करण्यात येणार आहे.

         सहभागी झालेल्या व्यक्तींनी धावलेले/चाललेले अंतर/ मॅरेथॉन फिट इंडिया पोर्टलवर (www.fitindia.gov.in) या संकेतस्थळावर नोंद करावी. फिट इंडिया मिशनव्दारे संघटक आणि व्यक्तींनी सामाजीक अंतर राखण्याचे निकषानुसार 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत धावणे/चालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फिटनेस का डोस आधा घंटा रोज हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. धावणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. त्यास नेहमी तंदुरुस्त नियमित व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाकरीता प्रोत्साहीत करण्यासाठी आणि सर्वांना लठ्ठपणा आळस, तणाव, चिंता. आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी मदत करण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया रन 3 कि.मी. धावणे ही चळवळ 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

          या उपक्रमामागील संकल्पना ही तुम्ही कोठेही, कधीही पळू/चालु शकता. प्रत्येक जण धावण्यासाठी/चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीश: अनुकुल वेळ निवडू शकतात. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे/चालणे करु शकणार आहे. प्रत्येकास स्वतःच्या वेगाने धावणे/ चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रैकिंग अॅप किंवा जीपीएस घडयाळाचा वापर करून धावलेल्या/चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे.

          शासकीय अधिकारी, कर्मचारी, क्रीडा संघटना, नागरीक, खेळाडू, विदयार्थी, व्यवसायीक महीला वर्ग, ज्येष्ठ नागरीक तसेच क्रीडा प्रेमी यांनी फिट इंडिया फ्रिडम रन या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.